Barayan Marathi Movie Review - VeerMarathi.com | Marathi Movies, Video Songs, Trailer, News, Reviews, Tv Serials, Marathi Mp3 Songs

Breaking

Sunday 14 January 2018

Barayan Marathi Movie Review


Review : Barayan
Producer : Daivata Patil and Deepak Patil
Director : Deepak Patil
Studio : Onjal Arts Productions
Star Cast : Anurag Worlikar, Nandu Madhav, Pratiksha Lonkar, Sanjay Mone, Vandana Gupte, Om Bhutkar, Kushal Badrike, Uday Sabnis, Sameer Chougule, Prabhakar More, Prasad Pandit, Nipun Dharmadhikari, Shrikant Yadav, Rohan Gujar, Prarthana Behere, Nandu Patil, Swapnil Rajshekhar, Umesh Bolke, Rajendra Jadhav, Vidhi Chitalia, Anil Gawade
Story : Deepak Patil
Screenplay and Dialogues : Nilesh Upadhye
Review By : Vaibhav Malwade

Review - 


आयुष्यातील दोन महत्वाचे टर्निंग पॉइंट म्हणजे दहावी आणि बारावी. बारावीनंतर करियर म्हणजे मेडिकल आणि इंजिनिरींग असा गोड गैरसमज पूर्वी बाळगला जायचा. प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबात हि एका कथा थोड्या बहुत प्रमाणात पाहायला मिळते.



बारायण हा चित्रपट देखील अशाच एका कथेवर आधारित आहे. हि कथा आहे अनिरुद्धची (अनुराग वरळीकर). अनिरुद्धच्या आई-बाबाचं (प्रतीक्षा लोणकर आणि नंदू माधव) यांची इच्छा असते की बारावीनंतर अनिरुद्धने मेडिकल किवा इंजिनीरिंग करावी. एका मध्यमवर्गीय पालकांच्या आपल्या मुलांकडून ज्या अपेक्षा असतात अगदी तश्याच यांच्या पण असतात, पण अनिरुद्धला मेडिकल किवा इंजिनीरिंगमध्ये फारसा रस नसतो. अनिरुद्धचं बालपण हे कोकणात, समुद्री किल्यांच्या गेलेलं. त्याचा छातीत उफाणलेल छत्रपती शिवाजीमहाराजांच्या स्वराज्याच बेफाव वार. हे वारंच त्याला साद घालत असतं. पण हे वारं भरलेली त्याची शिडाची होडी त्याच्या आई-वडिलांच्या इच्छा-आकांक्षांमुळे भलत्याच दिशेने निघालेली असते. अनिरुद्धची ही होडी योग्य मार्गावर येते का किंवा ती तशीच भवसागरात भरकटते, ते पाहण्यासाठी सिनेमाच पाहावा लागेल.



बारायणमधील बारावी आणि बारावीनंतरचं करिअर हा विषय तसा जुनाच आहे. यांसारख्या विषयावर बरेचशे चित्रपट येऊन गेले. बारायण हा चित्रपट देखील अशाच एका कथेवर आधारित आहे. अलीकडच्या बऱ्याच मराठी सिनेमांना नायकाबरोबर त्याच्या मित्रांची चौकडी का लागते, तेच कळत नाही. बरं ही चौकडी नेहमीच गरजेची असते असंही नाही. बारायणमध्येही अशी चौकडी आहे आणि तत्त्वत: विषयाच्या परिपोषासाठी तिचा फार उपयोग झालाय असं नाही. याउलट नायकाच्या आयुष्यातील काही प्रसंगांची गंभीर मांडणी केली असती, तर कदाचित लेखक-दिग्दर्शकाला जो विषय मांडायचा आहे तो गंभीरपणे मांडला गेला असता.


बारायणमधील छायाचित्रणासारख्या तांत्रिक बाजू चांगल्या आहेत. संगीतसुद्धा साजेस आहे. चित्रपटात प्रतीक्षा लोणकर, नंदू माधव, संजय मोने, वंदना गुप्ते, उदय सबनीस, समीर चौघुले, यांसारखे अनेक मान्यवर कलाकार आहेत, त्या सगळ्यांनीच छान कामं केलीत. त्याचबरोबर मित्र, त्याची बहीण (स्वरांगी साने) आणि तिचा कंपू किंवा मन्याचा इंजिनियरिंगचा कंपू... सगळ्यांनीच आपापली कामं चोख केलीत. परंतु विषयच जुना असल्यामुळे सिनेमाचा म्हणावा तसा आकर्षित करू शकत नाही.

Barayan Marathi Movie Trailer -





Tag
Barayan Marathi Movie Review, Barayan Marathi Movie Trailer, Barayan Movie Review in Marathi, Barayan Review, Stars, Estimate Earning, Barayan Time Show, Barayan Movie Tickets Online, Barayan Full HD Marathi Movie Download, Barayan Movie Cast, Wiki, Actor, Actress, Photos

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad